आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Raj Thackeray । MNS । Three Arrested In Mumbai For Demanding Ransom Under Raj Thackeray's Name; Notice Also Issued To A Marathi Actress

राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी:मुंबईत राज ठाकरे यांच्या नावाखाली खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस, तीन जणांना अटक; एका मराठी अभिनेत्रीला देखील बजावली नोटीस

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलीसांनी पर्दाफाश केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माते युवराज बोराडे आणि त्यांचे चालक सागर सोलंकर याचा देखील समावेश आहे. तसेच राज ठाकरे यांच्या नावाखाली खंडणी मागितल्या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस बजावली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपींनी महाड परिसरातील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला खंडणीवरून मारहाण केली होती. त्यानंतर सदरील प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्या व्हिडीओमध्ये महिला त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करतांना दिसत आहे. तसेच "राजसाहेबाला नाही ओळखत, महाराष्ट्रात आहेस तू... तुला मराठी येत नाही" असे म्हणत त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली होती. सुरक्षा रक्षकाने सदरील प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी चौकशी करून राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक केली आहे. तर सदरील महिलेला नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...