आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा पत्ता बदलला:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नवे घर 'शिवतीर्थ'मध्ये स्थलांतर; राज पुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते पाटीचे अनावरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नव्या घरात स्थलांतर झाले आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांना आता राज ठाकरे कृष्णकुंजवर नाही तर शिवतीर्थवर भेटणार आहेत. राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते नवीन घराच्या पाटीचे अनावरण आणि पूजा करण्यात आली. 6 नोव्हेंबर अर्थातच आज पासून राज ठाकरे यांनी येथे गृहप्रवेश केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कुटुंबियांचे नवीन घर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कुटुंबियांचे नवीन घर

राज ठाकरे यांचे आधीचेच निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजच्या अगदी शेजारी त्यांचे हे नवीन घर आहे. नुकतेच या बंगल्याचे बांधकाम पूर्ण झाले. तसेच भाऊबीजेच्या मुहूर्तावर त्यांनी सहकुटुंब येथे राहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. अमित ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' या बंगल्याच्या पाटीचे अनावरण आणि पूजा केली. त्यानंतर ठाकरे कुटुंबियांचा गृहप्रवेश झाला. यानंतर राज ठाकरे यांनी घराच्या गॅलरीतून बाहेर थांबलेल्या आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांना हात दाखवून अभिवादन केले. यावेळी नितीन सरदेसाई सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते.

नवीन घरात प्रवेश केल्यानंतरचा आनंद राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
नवीन घरात प्रवेश केल्यानंतरचा आनंद राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

मनसे अध्यक्षांनी आपल्या या नवीन घराच्या ग्राउंड फ्लोअरवर समिती कक्ष उभारले आहे. याच फ्लोअरवर मनसेचे कार्यालय तयार करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि येणाऱ्या राजकीय सहकाऱ्यांना राज ठाकरे याच ठिकाणी भेटतील. वरच्या मजल्यावर कुटुंबियांच्या राहण्यासाठी सर्व सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. यासोबतच, राज यांनी आपल्या घरात भव्य ग्रंथायलय सुद्धा तयार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...