आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं:म्हणाले - रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात नको, पण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिफायनरीसारखे प्रकल्प कोकणासारख्या उत्तम जागी येऊ नयेत. पण महाराष्ट्रातील सद्यस्थिती पाहता प्रकल्प राज्याबाहेर​ जाणे हे देखील योग्य नाही अशी स्पष्ट भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी येथे त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

लपून छपून..

राज ठाकरे म्हणाले, लपून छपून भुरटे जमीन खरेदी करायला येतात त्यावेळीच खबरदारी घेतली तर संभाव्य नुकसान टळते. बाहेरची माणसे पट्टेच्या पट्टे खरेदी करतात तेव्हा लोकांना काहीच संशय येत नाही. हजारो एकर जमीन हातातून निघून जाते आपल्याला कळत नाही की या जमीनी कशासाठी खरेदी होते. यावर संशयही लोक घेत नाही.

मग आपण ओरडतो

राज ठाकरे म्हणाले, एरव्ही ज्या गोष्टींच्या गप्पा मारल्या जातात पण जमीनीबाबत बाहेरचे लोक जमीनी विकत घेत असतील तर त्यावर आपण सर्वकष विचार करीत नाही. मग केंद्र सरकार जमीनी विकत घेतात तेव्हा दर मिळत नसल्याचे आपणच ओरड करतो. वर्षानुवर्षे आपण त्याच गोष्टी करतो.

आम्हाला कोकणात संधी

राज ठाकरे म्हणाले, कोकणात मनसेसाठी सकारात्मक वातावरण आहे. कोकणातील पक्ष संघटना आगामी काळात मजबूत होईल. जानेवारीत कोकणात दोन सभा घेणार असून एक सभा कुडाळ आणि दुसरी सभा चिपळूण किंवा रत्नागिरी येथे होईल.

उठसूट बोलणे योग्य नाही

राज ठाकरे म्हणाले, कोणीही उठून इतिहासावर बोलणे योग्य नाही. कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती तपासावी. इतिहास हा रुक्ष आहे तो सिनेमात रंजक करून दाखवला तरच लोक पाहतात. इतिहासाला डाग लागू नये, स्फुर्ती मिळावी यासाठी चित्रपट तयार केले जातात. ज्यांना आक्षेप आहेत, त्यांनी चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला पाहिजे. विरोध करू नये.

बातम्या आणखी आहेत...