आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय वन मंत्रालय व झारखंड राज्य सरकारने झारखंड राज्यात असलेल्या गिरडीह जिल्ह्यातील जैन धर्माचे तिर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे देशभरातील जैन धर्मीयांमध्ये नाराजी पसरली आहे. यातच आता राज ठाकरे यांनीही जैन बांधवांच्या मागणीला पाठींबा देत केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे.
केंद्रीय वन मंत्रालय व झारखंड राज्य सरकारने झारखंड राज्यात असलेल्या गिरडीह जिल्ह्यातील जैन धर्माचे तिर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे देशभरातील जैन धर्मीयांमध्ये नाराजी पसरली आहे. याविरोधात सकल जैन समाज एकटवटला असून उपोषण, मोर्चे काढत सरकार विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
जैन समाजाची मागणी
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व प्रधानमंत्री मोदी यांच्या नावे निवेदन देत सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ तत्काळ रद्द करून तिर्थस्थळ घोषित करण्याची मागणी करण्यात आली.
राज ठाकरेंचे ट्विट
राज ठाकरेंनी ट्विट केले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे. झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, आणि हे होत नसेल तर केंद्र सरकारने ह्यात त्वरित हालचाल करावी.
मान्य नसलेल्या गोष्टी घडतील
राज ठाकरे म्हणाले, झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं 'सम्मेद शिखरस्थळ' हे जैन धर्मियांचे पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाले की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.