आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांची महिलांना ऑफर:जागतिक महिला दिनी राजकारणात येण्याचे आवाहन; महाराष्ट्र नवनिर्माण सेना संधी देण्यास उत्सुक

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना संधी देण्यासाठी उत्सुक असल्याचे ते म्हणाले.

जगभरात आज जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक पत्र काढून ही ऑफर दिली आहे. त्यांनी हे पत्र ट्विटही केले आहे. राज ठाकरे यांची ऑफर आणि पत्र जशास तसे...

राज यांचे पत्र असे...

आज जागतिक महिला दिन सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरू आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची स्वतच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

१००, १५० वर्षापूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाया संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था परराष्ट्र व्यवहार सीमाचं संरक्षण ते राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावले आहे. म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठया प्रमाणावर यायला हवं.

'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणाया स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे. पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

आपला नम्र,
राज ठाकरे

बातम्या आणखी आहेत...