आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचे वागणे पाहूनच पवारांनी राजीनामा मागे घेतला असावा:राज ठाकरेंनी रत्नागिरीतल्या सभेतून काढले चिमटे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी रत्नागिरीतल्या सभेतून शरद पवारांच्या राजीनाम्यावरूनही खोचक चिमटे काढले. पवारांना राजीनामा द्यायचा होता, पण अजित पवारांच्या त्या दिवशीच्या वर्तणुकीवरून त्यांनी निर्णय मागे घेतला असावा असे राज ठाकरे म्हणाले.

म्हणून त्यांनी निर्णय बदलला असावा

शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. पण अजित पवार त्या दिवशी जसे वागले ते पाहून त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा असे मला वाटते असे राज ठाकरे म्हणाले. अजित पवार त्या दिवशी जसे वागत होते, ते पाहून पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा.

उद्या मलाही गप्प बस म्हणेल

पवारांनी राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवारांचे ए तू गप्प बस, ए तू शांत बस, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असे सुरू होते. हे पाहून पवारांना वाटले असेल की हा आताच असे वागतो, उद्या मी राजीनामा दिल्यावर उद्या मलाही म्हणेल गप्प बस. त्या भितीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा असे राज ठाकरे म्हणाले.

महापौर बंगला विचारून ढापला का?

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज बारसूला येऊन गेले. लोकांची जी भावना आहे ती आमची भावना आहे असे ते म्हणाले. मग मुंबईचा महापौर बंगला काय लोकांना विचारुन ढापला का? अशा शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.

जमीन कशाला हवी हे विचारा

सगळ्या कोकणवासियांना माझी ही विनंती आहे की तुमची जमीन घ्यायला कुणी आला तर त्याला विचारा की तुला कशाला ही जमीन हवी आहे? हीच जमीन तुम्हाला उद्या पैसे देईल. आत्तापर्यंत जे व्यापारी लोकप्रतिनिधी निवडून देत आलात ना? त्यांना जरा घरी बसवा असेही राज ठाकरे म्हणाले. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व काय? कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे काय आहात? या जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर आहे, त्यावर तुम्ही उभे आहात. जमीन म्हणजे काय? भुगोल. मोगलांचं राज्य आलं, ब्रिटिशांचं राज्य आलं, युद्ध झाले. यांनी तिथे आक्रमण केलं, या सगळ्यांकडे इतिहास म्हणून पाहिले तर इतिहास भुगोलाशिवाय नाही असे राज ठाकरे म्हणाले.

ही बातमीही वाचा...

माझं कोकण वाचवा, हे सांगण्यासाठी मी इथे आलो:रत्नागिरीतील सभेतून राज ठाकरेंची टीका

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शनिवारी रत्नागिरीतील सभेतून कोकणातील प्रकल्पांवरून उद्धव ठाकरेंवर तिरकस निशाणा साधला. (वाचा पूर्ण बातमी)