आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Raj Thackeray Speech On Gudhi Padwa | Marathi News | Sharmila Thackeray Comment On Public Meeting Of Raj Thackeray On Gudi Padwa | Marathi News 

आज शिवतीर्थावर जाहीर सभा:मी कधीच राज ठाकरे यांना काहीच सल्ले देत नाही, राजकारणात त्यांना माझ्यापेक्षाही जास्त कळते- शर्मिला ठाकरे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज राज्यभरात गुडी पाडवा हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवतीर्थावर जाहीर सभा घेणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार, काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला तसेच राज ठाकरेंकडून काय अपेक्षा आहेत हे देखील विचारण्यात आले. यावर शर्मिला ठाकरे यांनी मी कधीच राज ठाकरे यांना काहीच सल्ला देत नाही, असे थेट उत्तर दिले आहे.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “मी कधीच राज ठाकरे यांना काहीच सल्ले देत नाही. राजकारणात त्यांना माझ्यापेक्षाही जास्त कळते. त्यांना लोकांचे प्रश्न जास्त माहिती असतात. त्यामुळे ते सर्वांबद्दल काहीतरी बोलतील. अमितला देखील मी आई म्हणून सल्ले देत नाहीत. माझ्यापेक्षा त्यांना राजकारणातील जास्त कळते. अमितचे वडील म्हणून राज ठाकरे त्याला सूचना देतील.” अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.

सभेच्या गर्दीसाठी काळजी नाही

राज ठाकरे यांची सभा कायमच रेकॉर्ड ब्रेक होत असते, त्यामुळे आम्हाला गर्दीची आवश्यकता नाही. उलट कोरोना काळात बघितले तर त्यांनी जिथे जिथे शाखा उद्घाटन केले तेथे निर्बंध असूनही धक्काबुक्की होईल अशी गर्दी होती. त्यामुळे सभेला गर्दीची आम्हाला काळजी नाही. असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

जो जे वांछिल तो तेलावो-अशी प्रार्थना करते

पुढे बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “आज आनंद असा आहे की आज महाराष्ट्रावरील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. कोरोनामुक्त महाराष्ट्र झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आयुष्य रोगराईमुक्त जावो. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बंद होऊन त्यांना सगळ्यांना त्यांच्या नोकऱ्या मिळू दे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होऊ दे. त्यांना वीज मोफत मिळू दे. सगळ्यांना ‘जो जे वांछिल तो तेलावो’ अशी मी प्रार्थना करते. असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

मुलाआधी मी पोलिसांना गोड दिलं

गेली दोन वर्ष महाराष्ट्रानेच नाही तर संपुर्ण जगाने फार हालाखित काढले. तसे दिवस परत येऊ नये. आज आम्हाला आमचे सर्व सैनिक भेटत आहेत याचा आनंद आहे. आमची भेट दोन वर्षांनी होत आहे. त्यामुळे आणखी उत्साह आहे. मी दरवर्षी पेढे आणि बर्फी वाटते. मला वाटतं आपण गोड खाऊन आपला दिवस गोड करतो, पण पोलिसांसह हे लोक दिवसभर 8 ते 16 तास त्यांच्या ड्युटी सुरू राहतात. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा गोड दिले पाहिजे. मी माझ्या मुलांच्या आधी पोलिसांना गोड दिले, असे शर्मिला ठाकरे म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...