आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोमती ठाकूर यांचा सवाल:राज ठाकरेंची वाटचाल भाजपची बी टीमकडे; बेरोजगारी-महागाई विसरून त्यांनी सेटलमेंट केली? यशोमती ठाकूर यांचा खोचक सवाल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेच्या गुडी पाडव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकारण चांगले तापताना दिसत आहे. राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अनेकजण त्यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. आता काँग्रेसनेही राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा त्याच स्टाईलने समाचार घेतला आहे. "बेरोजगारी-महागाई विसरून राज ठाकरेंनी सेटलमेंट केली का?" असे म्हणत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज ठाकरे यांना खोचक सवाल करत टीका केली आहे. ठाकूर आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

राजकारणात सातत्याने येणार्‍या अपयशामुळे राज ठाकरे हे खचून गेले असून त्यांची वाटचाल आता धर्मांधतेच्या दिशेने सुरू आहे. राज ठाकरे यांनी विकासाच्या छाताडावर बसून धर्माचा झेंडा फडकवायचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र यामुळे केवळ विकृत राजकारण जन्माला येईल, पण त्यांना यश मिळणार नाही. कारण देशातील खरे प्रश्न हे महागाई आणि बेरोजगारी आहेत. अशी खोचक टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

पुढे ठाकूर म्हणाल्या की, राज ठाकरेंसारखे नेते महाराष्ट्राशी एवढे खोटे कसे काय बोलू शकतात. त्यांच्यात काही सेटलमेंट झाली का ? असे प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केले. आपल्या पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रातून निदान मराठी नवीन वर्षाच्या दिवशी तेही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असलेल्या मैदानातून तरी अशी सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य होणे अपेक्षित नाही. असा टोला देखील ठाकूर यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

खरे प्रश्न विसरलात का?

राज ठाकरे यांची वाटचाल आता भाजपची बी टीम म्हणून होते आहे का? हा खरा प्रश्न आहे. कारण देशाला खरा धोका राज ठाकरेंच्या मागे ED लावणाऱ्यांपासून आहे. निवडणूकांनंतर एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि गगनाला भिडलेली महागाई हे खरे प्रश्न आहेत. हे तरुणाईचे नेते असलेले राज ठाकरे विसरले वाटत. या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत राज ठाकरे यांनी दिलेली धर्मांधतेची हाक ही राज्यासह देशात सामाजिक विध्वंस निर्माण करणारी ठरणार आहे. राजकीय नैराश्यातून राज ठाकरे यांनी ब्ल्यू प्रिंट काढत सुरू केलेला विकासाचा मार्ग आता विनाशाच्या मार्गाकडे सुरू आहे, अशी तिखट प्रतिक्रिया ठाकूर यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे बोलत आहेत. ते म्हणाले की, "माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. तुम्ही ईडी, इन्कम टॅक्सना धाडी टाकताय ना, पोलिसांना विचारा. झोपडपट्ट्यातल्या मदरशांवर धाडी टाका. काय काय हाती लागेल. प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. "ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?" असे राज ठाकरे म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...