आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरे सरसावले ; उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढे सरसावले आहेत. या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (१५ डिसेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी या भेटीत केल्याची माहिती राज यांनी दिली. शायना एनसी व आय लव्ह मुंबई या संस्थेतर्फे आयोजित वृक्ष प्रदर्शनाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई मनपा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे राज यांनी कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातल्याचे भेटीमागे कारण मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...