आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Raj Thackeray Took Bappa's Darshan On 'Varsha' At The Chief Minister's Residence Along With Thackeray's Family; Half An Hour Discussion Between The Two Leaders

राज ठाकरेंनी अचूक वेळ साधली:सहकुटुंब वर्षावर घेतले बाप्पाचे दर्शन; भाजप-शिंदेंच्या स्नेहभोजनावेळी भेटीने चर्चांना उधान

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या निवासस्थानी जात बाप्पाचे दर्शन घेतले आहे. जवळपास दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली, शिंदेंच्या घरी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनी हजेरी लावल्याने आगामी मनपा निवडणुकीत शिंदे गट आणि मनसे एकमेकांना मदत करणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

वर्षा बंगल्यावर आज भाजप आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते तसंच आमदारांच्या स्नेहभोजनाचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या काही वेळ आधीच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले.

मनसे प्रमुख आणि मुख्यमंत्री
मनसे प्रमुख आणि मुख्यमंत्री

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. तसेच मागच्या काही दिवसांमध्ये भाजप नेतेही अनेकवेळा राज ठाकरेंच्या घरी गेले होते.

खासदार श्रीकांत ठाकरेंनी केले मनविसे अध्यक्ष अमित ठाकरेंचे स्वागत
खासदार श्रीकांत ठाकरेंनी केले मनविसे अध्यक्ष अमित ठाकरेंचे स्वागत

तेव्हापासून या तिन्ही पक्षांमध्ये होत असलेल्या जवळीकीची चर्चा सुरू झाली आहे. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा संपवून पुन्हा दिल्लीला गेले.

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा

या दौऱ्यात अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले. अमित शाह यांच्या मिशन मुंबईच्या रणनितीनंतर एकाच दिवसात राज ठाकरे भाजप-शिवसेनेच्या बैठकीवेळी वर्षावर जात असल्यामुळे पुन्हा एकदा तिन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज ठाकरेंच्या पत्नीही होत्या उपस्थित
राज ठाकरेंच्या पत्नीही होत्या उपस्थित
आमदार राजू पाटील, मनसे सचिव सचिन मोरेंची ही उपस्थिती
आमदार राजू पाटील, मनसे सचिव सचिन मोरेंची ही उपस्थिती
बातम्या आणखी आहेत...