आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र धर्माची शपथ:राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले - शिवरायांचे सुराज्य पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

राज्यभरात आज ठिकठिकाणी तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भव्य शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दादरमधील शिवाजी पार्कमध्ये आयोजित या सोहळ्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावत शिवरायांना अभिवादन केले. नंतर कार्यकर्त्यांसोबत महाराष्ट्र धर्माची शपथ घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले सुराज्य पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी शपथ राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह घेतली.

नेमके काय म्हणाले राज ठाकरे?

 • आम्ही आज छत्रपती शिवरायांच्या जंयतीनिमित्त शपथ घेतो की, स्वराज्य उभारणीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात पुन्हा सुराज्य व्हावे, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु.
 • सुराज्य स्थापन करताना जाती-जातींमध्ये विभागलेला समाज एक कसा होईल, यासाठी प्रयत्न करू.
 • महिलांना सुरक्षित वाटेल. त्यांचा आत्मसन्मान राहिल, असे सुराज्य निर्माण करू.
 • सुराज्यात युवकांना रोरजगार मिळेल, प्रत्येक मुल शाळेत जाईल, लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळावी, यासाठी प्रयत्न करू.
 • महाराष्ट्रातील शहरे सुंदर, सुरक्षित असतील यासाठी झटू.
 • राज्यातील भ्रष्टाचार नाहीसा होईल. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल. कामगारांना न्याय मिळेल , यासाठी वाट्टेल ते करू.
 • छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी, स्वावलंबी स्वराज्याचे स्वप्न आम्हाला दिले आहे. ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी आजिवन काम करत राहू.
 • आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, याचा विसर कधीही पडू देणार नाही.
 • आम्ही संपुर्ण निष्ठा शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला अपर्ण करतो.
 • आम्ही महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो व हा धर्म निभावण्याची शपथ घेतो.
बातम्या आणखी आहेत...