आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांवरील वक्तव्याने वाद:राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण; बाबरी प्रकरणी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर ट्विटद्वारे उत्तर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबरी प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंनी पाठराखण केली. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर ट्विट करून राज ठाकरेंनी उत्तर दिले आहे. बाळासाहेबांच्या प्रामाणिकपणावर, त्यांचे शौर्य, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी राज ठाकरेंनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐका असा सल्लाही मनसेतर्फे दिला गेला.

मनसेचे ट्विट

अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी राज ठाकरेंनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा!

व्हिडिओही केला ट्विट

बाळासाहेबांचा बाबरी विध्वंसाचा संबंध नसल्याबाबतची जी वक्तव्ये सध्या सुरू आहेत. त्यावर मनसेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात राज ठाकरे यांची काही मिनिटांची क्लिप दाखवली असून राज ठाकरेंनी त्यात तेव्हाचे अनुभव कथन केले.

त्या व्हिडिओत काय म्हणतात राज ठाकरे?

मनसेने ट्विट केलेल्या व्हिडिओत राज ठाकरे म्हणतात की, मला तोही प्रसंग आठवतो ज्यावेळी मी खोलीत खाली बसलो होतो. त्यावेळी बाबरी मशिद पडली होती. दुपारची वेळ होती. दिड दोन तासांनी बाळासाहेब ठाकरेंना फोन आला. त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की, येथे कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. पण भाजपचे सुंदलाल भंडारी म्हणत आहेत की, ही गोष्ट भाजप किंवा भाजपच्या लोकांनी केली नाही. कदाचित ती शिवसैनिकांनी केली असेल. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की, ही गोष्ट जर शिवसैनिकांनी केली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. त्यावेळी, त्या क्षणाला एक जबाबदारी अंगावर घेणे ही किती महत्वाची गोष्ट होती.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, 6 डिसेंबर 1992 रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का?

उद्धव ठाकरेंची टीका

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक-एक जण बिळातून बाहेर येतायत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी, पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये.