आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या मैत्रीचा श्रीगणेशा!:राज ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी घेणार बाप्पाचे दर्शन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान 'वर्षा'वर जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचे ते दर्शन घेणार आहेत. शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर गणपती दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना देखील वर्षावर येण्याचे आमंत्रण दिले होते.

मिळालेल्या माहितीनूसार, आज संध्याकाळी सात-साडेसात दरम्यान राज ठाकरे हे वर्षावर गणेश दर्शनासाठी जाणार आहेत. काल एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. त्यादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर शिंदे यांनी राज ठाकरेंना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्याला मान्य करत राज ठाकरे हे सात-साडेसात दरम्यान वर्षा बंगल्यावर पोहोचतील. सध्या गणेशोत्सव सुरू असून, यात अनेक नेतेमंडळी जवळ येताना दिसत आहेत. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही दुसऱ्यांदा भेट होणार आहे.

एकत्र येणार का?

राज्यात सत्तांतरादरम्यान राज ठाकरे यांनी भाजपला आणि शिंदे गटाला मदत केली होती. राज्यसभा, विधानपरिषद किंवा विधानसभा अध्यक्ष असो शिंदे आणि राज ठाकरेंची जवळकी आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय. दसरा मेळाव्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून बोलवण्याच्या चर्चा होत्या. मात्र काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना सध्या तरी असा विचार नसल्याचे सांगितले. मात्र, दसरा मेळाव्यात हे दोघे नेते एकत्र येतील का हे पाहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...