आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीच्या फडात वादाचे फटाके:राज ठाकरेंना कडवे आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह थेट पुणे दौऱ्यावर; मनसे आक्रमक होण्याची शक्यता

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत कडवे आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह डिसेंबरमध्ये पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मनसे विरुद्ध ब्रिजभूषण सिंह असा जंगी सामना पाहायला मिळू शकतो.

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानंतर राज ठाकरे यांची भूमिका भाजपला पूरक अशी राहिली आहे. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात मनसे सैनिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

ब्रिजभूषणांचा दौरा काय?

ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशातल्या कैसरगंज येथील भाजपचे खासदार आहेत. शिवाय गेल्या दहा वर्षांपासून ते कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे आहेत. दुसरीकडे राज्यात 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे या स्पर्धेचे आयोजक आहेत. मात्र, ब्रिजभूषण यांच्या दौऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जूनमध्ये होता दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यात त्यांचा पहिला कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये होणार होता. राज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेणार होते. मात्र, राज यांच्या दौऱ्याला ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला होता.

माफीची होती मागणी

उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. राज ठाकरे यांनी कमीत- कमी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी. तसेच पुन्हा कधीच उत्तर भारतीयांना आणि दक्षिण भारतीयांमध्ये भेदभाव करणार नाही, असे आश्वासन द्यावे, अशी मागणीही केली होती. यावरून बराच वादही रंगला. मात्र, राज यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा दौराच नंतर रद्द केला होता. आता ब्रिजभूषण पुण्यात येणार असल्यामुळे त्यांनाही विरोध होण्याची शक्यताय.

बातम्या आणखी आहेत...