आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावादावर बोलले राज ठाकरे:संघर्ष न करता मैत्री टिकवण्यातच सर्वांचे हित; कर्नाटक - महाराष्ट्र सरकारला आवाहन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक - महाराष्ट्र सीमावादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज एक पत्र ट्विट करीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तोंडावर आवर घालावा असे म्हणत कान टोचले आहेत. विशेषतः दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहेत. त्यामुळे संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचे हित आहे अशी भूमिका त्यांनी आज घेतली.

निवडणुकांमुळे त्यांना कलह हवाय

राज ठाकरेंच्या पत्रात नमूद आहे की, कर्नाटकातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवा असून त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्राने जे काही मिळवले ते संघर्ष करून मिळवले. त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असे वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावे.

ट्विटर, फेसबूकवर पत्र

राज ठाकरे यांनी याबाबत ट्विटर आणि फेसबुकवर एक पत्रही पोस्ट केले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले की, मी मध्यंतरी बोललो तसे महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतेय हे उघड आहे, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवे.

सीमा भागातील मराठी लोकांवरील हल्ल्यांमागे भाजप: सीएम शिंदे गप्प का? - थोरात

सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच आहेत. सीमा प्रश्नावर महाराष्ट्राची भूमिका काय आहे? पुढचे धोरण काय असेल ? यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आज केली आहे. येथे वाचा सविस्तर बातमी

तोंडावर आवर घाला

राज ठाकरेंच्या पत्रात नमूद आहे की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तत्काळ थांबवा.

आम्ही तीव्र उत्तर देऊ

राज ठाकरेंच्या पत्रात नमूद आहे की, पत्रात नमूद केले की, सीमावाद चर्चेने आणि सामोपचारानेच सुटावा. पण जर समोरून संघर्षाची कृती केली होत असेल तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचे उत्तर पण तितकेच तीव्र असेल हे विसरू नका.

छळले जातये

राज ठाकरेंच्या पत्रात नमूद आहे की, येणाऱ्या 2023 च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळले जातेय. माझ्या मराठी बांधवांनाही हे सांगणे असेल की, त्यांना जे हवे आहे ते नाही द्यायचे आपल्याला जे हवे तेच आपण करायचे.

राज ठाकरेंचे पत्र

राज ठाकरेंच्या पत्रात नमूद आहे की, अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधेसोपे नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावे. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पाहावे.

आम्ही आव्हान स्वीकारू

राज ठाकरेंच्या पत्रात नमूद आहे की, मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवत कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवत महाराष्ट्रात आहेत. दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचे हित आहे.

बातम्या आणखी आहेत...