आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृष्णकुंज:राज ठाकरेंच्या 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, 1 घरातील कर्मचारी, 3 वाहनचालकांसह 3 सुरक्षारक्षकांना झाली बाधा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरासह राज्यभरात कोरोना झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील तर सर्वच परिसरात कोरोनाने शिरकाव केलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाहन चालकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त होते. आता पुन्हा एक चालक हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. आता राज ठाकरे यांच्या एकूण 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजला कोरोनाने घेरले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. यानंतर त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. यानंतर एक वाहन चालक कोरोना पॉझिटिव्ह निघाला. आता त्यांच्या दोन चालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता राज ठाकरे यांच्या जवळील 7 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्यांवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser