आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Raj Thackeray's Attempt To Create Rift Between Hindus And Muslims By Keeping An Eye On Votes, But ... We Will Give Sherbet To Those Who Say Hanuman Chalisa Abu Azmi

आझमींची गांधीगिरी:मतांवर डोळा ठेवून हिंदू -मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न, पण..आम्ही हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना शरबत देऊ - अबु आझमी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदीवरील भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत दिला होता. त्यावर समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी सुचक प्रतिक्रीया दिली असून "मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको", असे वक्तव्य त्यांनी केले.

मनसेप्रमुख राज ठाकरे , यांनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवाजी पार्कवर मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. त्यावरून राज ठाकरे टीकेचे धनीर झाले होते. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी गांधीगिरी करीत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अबु आझमी?

''केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही. "मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको" असे ते म्हणाले.

हिंदु सणांवेळी आम्ही तक्रार केली नाही

"मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनीप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का?" असा राज ठाकरे यांना प्रश्न विचारत अबु आझमी म्हणाले की, आम्ही कधीही याबाबत तक्रार केली नाही.

तर..राज ठाकरेंवर कारवाई करावी

"सभा व अन्य कार्यक्रमांतील फटाक्यांमुळेही ध्वनिप्रदूषण होते. पण आम्ही तक्रार केली नाही. शिवाजी पार्क सायलेंट झोनमध्ये येतो. मग त्यांच्या सभेवेळी आवाजाची पातळी किती होती? किती ध्वनिप्रदूषण झाले? याची पोलिसांनी तपासणी करुन कारवाई करावी." असेही आझमी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...