आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. वाझे यांनी स्वतः येऊन आपल्याला या वसूलीच्या कथित टार्गेटची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. आता यावर आता गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा मागितला जात आहे. या सर्व विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य केले आहे. तसेच केंद्राने या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा
अशी घटना राज्यात घटने ही खूप दुर्दैवी बाब आहे. एखाद्या पोलिस कमिश्नरने गृहमंत्र्यांवर आरोप केले. अशी घटना आजपर्यंत देशाच्या इतिहासात घडली नसेल. आता ज्यांनी आरोप केले त्यांना येऊन आता एक वर्ष झाले असेल. एक वर्ष झाले असेल तर महिना शंभर कोटीप्रमाणे आतापर्यंत 1200 कोटी द्यायला पाहिजे होते. पण लॉकडाऊनमुळे त्यांना एवढी रक्कम देता आली नसेल. पण गृहमंत्र्यांनी अशी गोष्ट सांगणे हे केवळ मुंबईचे झाले. पण राज्यामध्ये शहरे किती, आता या शहरांमधील पोलिस कमिश्नरांना देखील यांनी काय काय सांगितले हे समोर आलेले नाही. आता अनिल देशमुख यांची चौकशी होणे गरजेचे आहे.
केंद्राकडून याची चौकशी झाली तर फटाक्याची माळ लागेल
दहशतवादी बॉम्ब ठेवतात असे ऐकले होते. पोलिस बॉम्ब ठेवतात हे पहिल्यांदा पाहिले आहे. बॉम्ब ठेवण्यासाठी कुणाचे तरी इंस्ट्रक्शन असल्याशिवाय पोलिस असे धाडस करणार नाही. यामुळे केंद्र सरकारला विनंती करत आहे, केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा. याची चौकशी महाराष्ट्राकडून होणार नाही. केंद्राकडून याची चौकशी झाली तर फटाक्याची माळ लागेल. कोण कोण आत जातील. याची आपण कल्पना देखील करु शकणार नाही. ज्या मुकेश अबानींच्याकडे स्वतःकडे त्यांची जी सिक्यूरिटी आहे. त्यांच्या घराजवळ बॉम्ब ठेवलेली गाडी आढळते ही एक गंभीर बाब आहे.
'पोलिस बॉम्ब ठेवतात, ही घटना एवढी क्षुल्लक नाही'
'अशी अवस्था मी महाराष्ट्राची कधीच पाहिली नव्हती. गृहमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावा. केंद्र सरकारने कसून चौकशी करावी. असे झाले नाही तर हा देश अराजकाकडे जात आहे हे लक्षात ठेवा. हे साधे सोप काम नाही. पोलिस बॉम्ब ठेवतात. ही घटना एवढी क्षुल्लक नाही. याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी.' अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.