आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या हाती काय तर घंटा!:राज ठाकरेंची मिश्किल टीप्पणी, म्हणाले- मी, फडणवीस, सीएम एकत्र बघून लोकांना वाटेल एकावर एक फ्रि आहे का?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे येऊन गेले. त्यांचे आणि आमचे आधी कार्यक्रम एकत्र झाले. मला असे वाटले की, या कार्यक्रमाला येऊ की नको, कारण लोकांना वाटायचे की, एकावर एक फ्री मिळतेय का? आम्ही दीपोत्सवाला एकत्र होतो लोकांना वाटणार की, हे आले म्हणजे ते येणार अशी कोपरखळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मारली.

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या एका नाटकाच्या बारा हजार पाचशे प्रयोगानिमित्त राज ठाकरे ष्णमुखानंद सभागृहात बोलत होते त्यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

तेव्हा 30 - 30 लोक आठवतात

राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडे कलाकारांना महत्व दिले जात नाही. आपल्याकडे जेवढ्या प्रतिमा जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. त्यामुळे आपल्याकडे पूल, शाळा आणि रस्त्याला नावे द्यायला तीस- तीस लोक आठवतात.

ते आम्ही आज म्हणणार..

राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीनंतर लोक जे म्हणतात ते आज आम्ही म्हणणार आहोत, आमच्या हाती काय आली तर घंटा. पण घंटा- घंट्यातील फरक आहे, ही वाजवायची घंटा आहे. ती नाटकातील आहे.

आमची नाटकं चांगली वाटतात?

राज म्हणाले, आज तुम्ही उपस्थित आहात यावरून दिसते की, आमचीही नाटकं तुम्हाला चांगली वाटतात. अभनेते प्रशांत दामले यांचे बारा हजार पाचशे प्रयोग म्हणजे विक्रमच. मी हे आकडे लिहून आणले कारण माझे गणीत कच्चे आहेत. प्रशांत दामले त्यांच्या आयुष्यातील कारकिर्दीत जवळपास एक हजार पाचशे बासष्ट दिवस रंगभूमीवर काम करीत आहे, ही सोपी गोष्ट नाही.

राज ठाकरे म्हणाले, मी अशोक सराफ यांचे परवा व्हॅक्युम क्लिनर हे नाटक पाहायला गेलो. त्यांची एंट्री होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. हा मान ते एवढे वर्ष जपत आले आहेत. प्रशांत दामलेही एवढ्या वर्षांपासून रसिकांचा मान आणि प्रेम सांभाळत आले आहेत.

सत्काराला मोठी माणसे उरली नाही

राज ठाकरे म्हणाले, मराठी महिला नटून खटून नाटकांसाठी येतात, त्या नटून चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत. या देशात मोठ्या माणसांचे सत्कार करण्यासाठी मोठी माणसे उरली नाही. आमच्यासारखे लोकांवर सत्कार आटपावे लागत आहे. विविध कलेंतील मंडळी आहे ही देशात जन्मली नसती तर या देशात कधीच अराजकता आली असती. आपण लोक यातच गुंतून पडलो त्यामुळे वाईट गोष्टीत पडतो.

लोकांना तसे वाटू शकते!

राज ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येऊन गेले. त्यांचे आणि आमचे कार्यक्रम एकत्र आधी झाले. मला असे वाटले की, या कार्यक्रमाला येऊ की नको, कारण लोकांना वाटायचे की, एकावर एक फ्री मिळतेय का? आम्ही दीपोत्सवाला एकत्र होतो लोकांना वाटणार की, हे आले म्हणजे ते येणार.

आपल्याकडे कलाकारांबद्दल महत्व नाही

राज ठाकरे म्हणाले, एखाद्या कलाकारांबद्दल लोकांमध्येच नाही तर सरकारमध्येही आत्मियता असते. आमचे कलाकार चौकात दिसतात. त्यांच्या नावाने फक्त चौकच असतात. आपल्याकडे कलाकारांबद्दल फारसे महत्व वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...