आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ:जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याने बंदोबस्तातील पोलिसांच्या संख्येत वाढ, दर्जा मात्र 'वाय प्लस'च

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याने राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना यापूर्वी असलेला वाय प्लस दर्जाच ठेवण्यात आला आहे. परंतू सुरक्षा ताफ्यातील पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. एक पोलिस अधिकारी आणि एक अंमलदार वाढवण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत, अशी मागणी करत मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला. त्यानंतर राज्यभरात भोंग्यावरून राजकारण पेटले. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. राज ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात घेता, सुरक्षेत वाढ केली आहे.

राज ठाकरे 5 जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या आधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे अयोध्येला जाणार तेव्हा उत्तर प्रदेश सरकारकडूनही त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येला मोठा फौजफाटा तैनात राहणार असल्याची शक्यता आहे.

वाय + सुरक्षा काय असते?
2020 पर्यंत राज ठाकरेंना Z+ सुरक्षा होती. परंतु ठाकरे सरकारने या सुरक्षेत कमी करून Y+ दिली होती. वाय प्लस श्रेणीमध्ये एक एस्कॉर्ट वाहन आणि वैयक्तिक सुरक्षारक्षकासह निवासस्थानी एक गार्ड कमांडर आणि चार गार्ड तैनात असतात. या गार्डपैकी एक हा उपनिरीक्षक पदाचा अधिकारी असतो. तर इतर तीन सुरक्षारक्षकांकडे शस्त्र असते. भारतातील सुरक्षा व्यवस्था झेड प्लस, झेड, वाय, आणि एक्स या चार विभागांमध्ये विभागलेली आहे. खासदार, आमदार, नोकरशहा, माजी नोकरशहा, न्यायाधीश, माजी न्यायाधीश, व्यापारी, क्रिकेटपटू, चित्रपट आभिनेते, संत, कधीकधी सामान्य व्यक्तींना या सुरक्षेचा लाभ घेता येतो. व्हीआयपी लोकांच्या जिवाला धोका असेल तर सुरक्षा देणे ही सरकारची जबाबदारी आहे.

बातम्या आणखी आहेत...