आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर:राज ठाकरे यांना कोणत्याच निवडणुकीत यश मिळत नाही, या नैराश्यातून शरद पवारांवर टीका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांना स्वतः चे ध्येयधोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीत यश मिळत नाही. त्या नैराश्यातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

निवडणुका आल्या की...

महेश तपासे म्हणाले, निवडणुका आल्या की शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही, हे समीकरण राज ठाकरे यांना कळाले आहे. त्यामुळेच ते आता शरद पवारांवर टीका करत आहेत.

वक्तव्य दिशाभूल करणारे

महेश तपासे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शरद पवार घेत नाहीत, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. हे राज ठाकरेंचे अतिशय चुकीचे वक्तव्य आहे. लोकांची दिशाभूल करणारे आहे. पवारांचे व्यक्तिमत्व काय आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे.

आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या शिंदे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. अशात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीदेखील मुख्यमंत्र्यांनी केलेले बंड हे शिवरायांच्या गनिमी काव्यासारखे होते असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचा निषेध महेश तपासे यांनी केला.

गनिमी कावा, फितुरी फरक कळतो का?

छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि फितुरी यातील फरक आमदार संजय गायकवाड यांना कळतो का? असा संतप्त सवाल करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात महेश तपासे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची मालिका भाजपने व शिंदेसरकारने स्विकारली का अशी शंका आता जनतेच्या मनात येत आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

इतिहास वाचण्याची आवश्यकता

वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे. त्यांचा 'गनिमी कावा' काय आहे. त्यामागे इतिहास काय आहे हे संजय गायकवाड व शिंदे - फडणवीस सरकारने वाचण्याची आवश्यकता आहे, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...