आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी दुर्घटना टळली:कोकण रेल्वे मार्गावर बोल्टरला धडकून रुळावरुन घसरली राजधानी एक्सप्रेस, दोन तासांनंतर रहदारी सुरळीत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रॅक दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे

शनिवारी दिल्लीहून गोव्याकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरीजवळ ट्रॅकवर पडलेल्या बोल्डरला धडकून रुळावरुन उतरली. या घटनेत कोणालाही इजा झाल्याचे वृत्त नाही आणि सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही ट्रेन दिल्लीतील हजरत निजामुद्दीनहून गोव्यातील मारगाव येथे जात होती. मुंबईहून जवळपास 325 कि.मी. अंतरावर कोकण रेल्वे मार्गावर हा अपघात झाला आहे.

शनिवारी सकाळी ही गाडी रत्नागिरीजवळील करबुडे बोगद्यात घुसली तेव्हा ती रुळावरून उतरली असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम अजूनही सुरू आहे.

ट्रॅक दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे
कोकण रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, रुळांवर एक मोठा दगड पडला होता, त्यामुळे रेल्वे रुळावरुन घसरली. रेल्वे देखभाल वाहन (आरएमव्ही) अपघातस्थळी पोहोचले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रेनला पुन्हा रुळावर आणण्यासाठी उपकरणे असलेली अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन (एआरएमव्ही) रत्नागिरीहून अपघातस्थळी पाठवली गेली आहे.

कोकण रेल्वे तीन राज्यात पसरली आहे
मुंबई (महाराष्ट्र) जवळ रोहा आणि मँगलोर (कर्नाटक) जवळ ठोकूर दरम्यान 756 किमी लांबीच्या मार्गावर रेल्वे संचालनाची जबाबदारी कोकण रेल्वेची आहे. हा मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत पसरलेला आहे आणि या मार्गावर अनेक नद्या, खोरे आणि पर्वत यांचा समावेश आहे, ज्यामुळे ते रेल्वेच्या एक आव्हानात्मक क्षेत्रापैकी एक आहे.

बातम्या आणखी आहेत...