आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्यमंत्र्यांची मागणी:'ऑक्सिजन मिळवण्यासाठी राज्य सरकार पाया पडायलाही तयार आहे', राजेश टोपेंची केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राला केंद्राने जास्त कोटा दिला पाहिजे.

राज्यात कोरोनाने कहर केला आहे. रुग्णांचा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय. दरम्यान राज्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आता याविषयीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. 'ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा यासाठी राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे' असे राजेश टोपे म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, 'राज्य सरकार अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, ऑक्सिजन मिळवण्यासाठी राज्य सरकार पाया पडायलाही तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धता कोटा वाटप हे केंद्र सरकारकडून केला जातो. महाराष्ट्राला केंद्राने जास्त कोटा दिला पाहिजे. तसेच ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी सुरक्षित ट्रान्सपोर्ट कॉरिडोअर उपस्थित करुन द्यावा' अशी मागणीही राजेश टोपेंनी केंद्राकडे केली.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावे लागणार आहे. यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत. उद्योगधंद्यांमध्ये सुध्दा पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. याचा वापर केला जाऊ शकेल का? याची चाचपणी सुरू केली जात असल्याचेही राजेश टोपे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...