आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजगृह तोडफोड प्रकरण:राजगृहावर तोडफोड करणारा मुख्य आरोपी 15 दिवसांनंतर अटकेत, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान राजगृहावर 7 जुलै रोजी तोडफोड केली होती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या राहगृहावर 7 जुलै अज्ञातांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी 15 दिवसानंतर तोडफोड करणाऱ्याला अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याचा साथीदार उमेश जाधव याला अटक केली होती.

यामुळे आरोपीने केली राजगृहाची नासधूस

विशाल मोरे (20 वर्षे) असे या आरोपीचे नाव आहे. विशाल मोरे कल्याण येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. राजगृहाबाहेरील परिसरात मोफत जेवण मिळत असल्याने विशाल तिथल्या समोरच्या पदपथावर राहायचा. मात्र घटनेच्या आदल्या दिवशी त्याला हटकले, त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.  

यापूर्वी पोलिसांनी विशालचा साथीदार उमेश जाधव याला अटक केली होती. उमेश दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत होते. याच आधारावर पोलिसांनी शोध घेऊन उमेशला अटक केली होती.

7 जुलै रोजी हिंदू कॉलनीमधील राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची, कुंड्यांची नासधूस केली होती. या दगडफेकीत राजगृहाच्या काचांचे नुकसान झाले होते. तसंच सीसीटीव्ही कॅमेरा फोडून हल्लेखोरांनी पळ काढला होता. माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईत जातीने लक्ष घातले.