आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:रजनी पाटील यांच्यासह चौघे राज्यसभेवर बिनविरोध, भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेत्या रजनी पाटील, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह चार नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. सोनोवाल आसाममधून, मुरुगन मध्य प्रदेशमधून आणि सेल्वा गणपती पुद्दुचेरीमधून निवडले गेले आहेत. पुद्दुचेरीमधून भाजपच्या एखाद्या नेत्याची राज्यसभेवर प्रथमच निवड झाली आहे. राज्यसभेच्या ७ जागांवर निवडणूक होत आहे.

महाराष्ट्रात भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनाचा विचार करून भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमेदवारी मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

बातम्या आणखी आहेत...