आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मनसेची प्रतिक्रिया:'महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे', मनसेची संजय राऊतांच्या 'रोखठोक' वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सगळीकडून कोंडीत सापडला आहात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचं कसं होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा - अमेय खोपकर

अभिनेत्री कंगना रनोट प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेले असताना शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादत संजय राऊतांनी रोखठोकमधून भाष्य केले होते. 'महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल' असं ते म्हणाले होते. तसेच यात राज ठाकरेंचाही उल्लेख होता. यावरुन मनसे सिनेमा विंगचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी चांगलेच सुनावले आहे.

'शॅडो संपादक महाशय, अगदी रोखठोकपणे सांगायचं तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे' अशा शब्दांत खोपकर यांनी संजय राऊत यांना तिखट शब्दात सुनावलं आहे. अमेय खोपकर म्हणाले की, 'सगळीकडून कोंडीत सापडला आहात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचं कसं होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरं, तुमचा आवाज लेख सगळीकडे व्हायरल झालाय तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच, हे ध्यानात असू द्या.

काय म्हणाले होते संजय राऊत?
सामनाच्या रोखठोक सदरात राऊत म्हणाले होते की,' ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल.'