आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध आंदोलन:भाजपचे आजचे आंदोलन पुतणा मावशी प्रेम, दूध आंदोलनावरून राजू शेट्टींची विरोधीपक्षावर टीका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता, त्यामुळे भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही

भाजपच्यावतीने राज्यभरात दूध दरवाढीच्या मागणीसाठी महाएल्गार आंदोलन सुरु करण्यात आले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहे. या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना फटकारून काढले आहे. भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे, अशी टीकाही शेट्टी यांनी केली आहे.

... तर ही भाजपकडून दूध उत्पादकांची फसवणूक

राजू शेट्टी म्हणाले की, 'भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. त्यामुळे भाजपला आता दूध आंदोलन करण्याचा अधिकार नाही, केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे.'

भाजपचे आजचे आंदोलन पुतणा मावशीचे प्रेम

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'भाजपचे आजचे आंदोलन पुतणा मावशीचे प्रेम आहे. कारण, दूध उत्पादकांसाठी ठोस उपाय योजना करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवावी, निर्यातीला सबसिडी द्यावी आणि जीएसटी मागे घ्यावा, असे केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल' असे म्हणत राजू शेट्टींनी भाजपवर घणाघात केला.

..तर राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, राजू शेट्टींचा इशारा

राजू शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर 5 रुपये जमा करावे, राज्य सरकारने लवकरच हे पाऊल उचलले नाही, तर राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही राजू शेट्टींनी दिला.

बातम्या आणखी आहेत...