आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभीमानी धोरण:राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? सरकार बेदखल करीत असल्याची खदखद, ५ एप्रिलला बैठकीत होणार निर्णय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धोरणात्मक निर्णय घेताना महाविकास आघाडी सरकार आम्हाला बेदखल करीत असेल तर त्यावर विचार करावा लागेल असे सुचक विधान स्वाभीमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी केले. याचा अर्थ राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता असून त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला हा धक्का असेल.

येत्या 5 एप्रिलला यावर पक्षाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ते एबीपीशी बोलत होते.

या सर्व घडामोडीवर बोलताना ते म्हणाले, “सरकारमधून बाहेर पडण्याचा मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या 5 एप्रिलला राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल”असे त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या पाठिंबा देण्यामुळे किंवा न देण्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर काही परिणाम होणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण महाविकास आघाडीचा नेता निवडताना सूचक म्हणून माझे नाव त्यांना घ्यावे वाटले त्याचे कारण स्वाभिमानीने अनेक वर्षांपासून टिकवलेले नैतिक अधिष्ठान आहे या बाबी सरकारला हव्या आहेत.

धोरणात्मक निर्णय घेताना आम्हाला बेदखल केले जात असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असेल आणि समोरून लोक म्हणत असतील की तुमचे सरकार असून तुम्हाला रस्त्यावर उतरावे का लागते तर यावर आम्ही विचार करायला हवे असेही ते म्हणाले.

शेट्टी यांचे मुद्दे

  • राज्य सरकार आपल्याशी संवाद साधत नाही.
  • ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर सरकार सत्तेत आले त्या किमान समान कार्यक्रमाचं काय झालं?
  • अनेक मुद्दे खटकणारे आहेत. अनेक मुद्द्यांबाबत फक्त किमान समान कार्यक्रम म्हटले गेले.
  • एखादं नवीन धोरण राबवताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संवाद साधला नाही.
  • सरकारला अडीच वर्ष होत आली आता सरकारचे समीक्षण करण्याची आता वेळ आली.

काय म्हणाले राजू शेट्टी

मी एकटा हा निर्णय घेऊ शकत नाही. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, अशा शब्दांत राजू शेट्टींनी सूचक इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...