आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्ताकारण:‘स्वाभिमानी’ राजू शेट्टी आमदारकीसाठी पवारांच्या दारी, विधान परिषदेवर निवड निश्चित

बारामती10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या अंगणात शेट्टींचे लाेटांगण - सदाभाऊ खाेत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टी यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. यावेळी खा. सुप्रिया सुळे, शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, राजेंद्र ढवान बैठकीला उपस्थिती होते. सहा वर्षांपूर्वी ऊस दराच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या विराेधात शेतकऱ्यांसह आक्रमक आंदाेलन करणारे राजू शेट्टी मंगळवारी पवारांच्या पाहुणचारासाठी बारामतीत गेले व आमदारकीची ऑफर स्वीकारण्यास राजी झाल्याने शेट्टी यांचे एकेकाळचे सहकारी व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीकेची झोड उठवली आहे. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार स्वाभिमानीला विधान परिषदेची एक जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. त्यांनी राजू शेट्टी यांना पवार कोकण दौऱ्यावरून आल्यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या अंगणात शेट्टींचे लाेटांगण - सदाभाऊ खाेत

मागील ५० वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांना ज्यांनी लुटले, कायद्याचा धाक दाखवून लुबाडले त्या प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या विराेधात आम्ही लढाई लढली आणि लाठीकाठी खाल्ली, गुन्हे दाखल झाले, परंतु आज शेट्टी त्याच लाेकांच्या मांडीला मांडी लावून नाहीतर मांडीवर जाऊन बसले आहेत. ज्यांच्या विराेधात शेतकरी उभा राहिला त्यांच्याच अंगणात शेट्टी यांनी लाेटांगण घातले ही बाब दुर्देवी आहे, अशी टीका रयतक्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केली आहे. खाेत म्हणाले, शेतकरी प्रश्नावर लढणारी माणसे विधिमंडळात जाणे चांगले आहे. शेतीबाबतची धाेरणे बदलण्यास ती मदत करू शकतील; परंतु ज्यांच्या विराेधात आतापर्यंत लढलाे त्यांच्याच मदतीने पदे मिळवणे चुकीचे आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेट्टी गप्प

युती सरकारच्या काळात शेट्टी कर्जमुक्ती, एफआरपी, दूध भाव, महापूर मदत अशा कारणासाठी आंदाेलन करत हाेते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते शांत झाले असून लाॅकडाऊनच्या काळात घरी बसून आनंदात दिवस घालवत हाेते. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, द्राक्ष बागा ताेडल्या जातात, रस्त्यावर शेतकरी कष्टाने पिकवलेले पीक फेकून देताे, दूध दर पडले पण शेट्टी आंदाेलन न करता गप्प बसले, असा आरोप खोत यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...