आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाच्या राज्यसभा निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळाली. राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विशेष करून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आज सकाळी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा ।
परि नाहीं दशा साच अंगीं ।। तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा ।
फजित तो खोटा शीघ्र होय ।।
असे संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
संभाजीराजे आक्रमक का?
संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभा लढवायची होती. त्यांनी अपक्ष म्हणून आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. मात्र, शिववसेनेने त्यांना पाठिंबा द्यायला नकार दिला. राऊतांनी आमची 42 मते आम्ही अपक्षांना का देणार, असा सवाल केला होता. शिवाय पाठिंबा हवा असेल, तर संभाजीराजेंनी पक्षात प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली. ही अट राजेंच्या जिव्हारी लागली. त्यात राज्यसभा निवडणुकीत मते फुटल्याचेही समोर आले. या साऱ्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी संत तुकारामांच्या अभंगाचे केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरला आहे.
धनंजय महाडिक यांचा विजय
राज्यसभेच्या सहा जगासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एका जागेवर उमेदवार निवडून आले आहेत. पण त्यामध्ये शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांच्या निवडणुकीकडे सर्वांचे पक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत पहिल्या पसंतीची सर्वाधिक 33 मते संजय पवारांना, तर भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची 27 मते मिळाली. तसेच दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवरून धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या विजयानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.