आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी मंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल:'पाण्यावर शेती करतात हे जगाला माहिती आहे, पण रक्ताने शेती केवळ काँग्रेसच करु शकते'

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जो टॅक्स फ्री करत आहे त्याच्या विरोधात आंदोलन केले जातेय - कृषी मंत्री

राज्यसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्याच्या मुद्यावरून सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. 'पाण्यावर शेती कशी करायची हे जगाला माहिती आहे, पण रक्ताने शेती केवळ काँग्रेसच करु शकते' असा आरोप कृषी मंत्र्यांनी लावला आहे.

कायद्यामध्ये काळे काय ?

कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, 'विरोधकांचे आभार त्यांनी शेतकरी आंदोलनावर चिंता व्यक्त केली. तसेच सरकारवर टीका करतांना कंजूसपणाही केला नाही. यासोबतच कृषी कायद्यांना जोर देऊन काळा कायदा बनवले. मी शेतकरी यूनियनला दोन महिने विचारत राहिलो की, कायद्यामध्ये काळे काय आहे. मात्र मला उत्तर मिळाले नाही.'

'रक्ताने शेतकरी केवळ काँग्रेस करू शकते'
कृषी मंत्री म्हणाले की, 'जर सरकार कोणत्याही संशोधनासाठी तयार असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की, कृषी कायद्यांमध्ये काही चूक आहे. कंत्राटी कायद्यातील कोणतीही एक तरतूद सांगा जी शेतकरी विरोधी आहे. ही एकाच राज्याची गोष्ट आहे. शेतकर्‍यांना फसवले गेले आहे. पाण्याने शेती कशी करायचे हे जगाला माहित आहे, केवळ कॉंग्रेसच रक्ताने शेती करू शकते, भाजप तसे करू शकत नाही.' असा आरोपही तोमर यांनी लावला.

'आमचा कायदा टॅक्स संपवू शकतो'
कृषी मंत्री म्हणाले की, आम्ही ट्रेड अॅक्ट बनवला. त्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे की, APMC मंड्यांबाहेर जो परिसर असेल तो ट्रेड एरिया असेल. हे शेतकर्‍याचे घर किंवा शेत देखील असू शकते जेणेकरून तो आपले उत्पादन कोठूनही विकू शकेल. APMC बाहेर असणाऱ्या व्यापारावर कोणताही राज्य किंवा केंद्रीय कर लागणार नाही. केंद्र सरकारच्या कायद्याने कर रद्द केला आहे. अनेक राज्य सरकारांचे अॅक्ट त्यांना APMC मध्ये कर भरण्यास भाग पाडतात.

'देशात उलटी गंगा वाहत आहे'
त्यांनी म्हटले की, 'मी विशेषतः पंजाबच्या शेतकऱ्यांना विचारु इच्छितो की, आम्ही टॅक्स फ्री केला, तुमच्या येथे राज्य सरकार टॅक्स घेत आहे. जो टॅक्स लावला जात आहे, त्याविरोधात आंदोलन कराल किंवा जो टॅक्स फ्री करत आहे त्याच्या विरोधात आंदोलन कराल? पण देशात आज उलटी गंगा वाहत आहे. पंजाबच्या अॅक्टमध्ये शेतकर्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मोडले तर त्यांना तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे. आमच्या अॅक्टमध्ये असे नाही.'

बातम्या आणखी आहेत...