आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक:महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश, भाजपला लोकसभेनंतर राज्यसभेतही मिळणार बहुमत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी 31 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर 10 जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. देशभरातील 57 राज्यसभेच्या जागासाठी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यात हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

राज्यातील राजसभा सदस्य पियुष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, विकास महात्मे, संजय राऊत, विनय सहस्रबुद्धे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. 15 राज्यांतील 57 सदस्य हे जून ते ऑगस्ट दरम्यान निवृत्त होत असल्याने ही निवडणूक आवश्यक होती. पियुष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, विकास महात्मे, संजय राऊत, विनय सहस्रबुद्धे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला आहे.

निवडणूक आयोगाने गुरुवारी, 12 मे रोजी राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले

24 मे: अधिसूचना जारी केली जाईल

31 मे : उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख

1 जून : अर्जाची छाननी

3 जून : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

10 जून : निवडणूक होणार

निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना निवडणूक आयोजित करताना कोरोना नियमांचे पालन केले जाईल याची खात्री करण्यासाठी राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...