आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Rajya Sabhe Election | Kirit Somaiya Critizsize On Shivsena | Sanjay Raut Violated The Code Of Conduct, How Did He Know The Views Of Independent MLAs

सोमय्यांचा सवाल:अपक्ष आमदारांची मते कोणाला, हे संजय राऊतांना कसे कळाले? निवडणूक आयोगाने कारवाई करावी

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी कोणाला मते दिली, हे शिवसेना नेते संजय राऊत यांना कसे कळाले? अशा आमदारांची नावे घोषित करुन राऊतांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले. निवडणूक आयोगाने याची दखल घेत संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेने संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. त्यावरुन शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेने अपक्ष आमदारांनी भाजपला मत दिल्याचा आरोप केला असून, संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांचे नावे कसे काय कळाली, असे सवाल सोमय्यांनी विचारला आहे.

अपक्ष आमदारांना धमक्या

पुढे सोमय्या म्हणाले की, संजय राऊत घाबरले आहेत, ते पूर्वी खूप जोशमध्ये होते, मात्र आता त्यांचा होश पूर्णपणे नष्ट झाला आहे. संजय राऊतांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. शिवसेना अपक्ष आमदारांना धमकी देत आहे की, विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार केले तर तुमचे मनसुख हिरेण करण्यात येईल. अशा धमक्या माफिया सरकार आमदारांसाठी वापरत आहेत. आता महाराष्ट्रात माफियागिरीचा अंताची सुरुवात राज्याच्या जनतेने केली आहे.

तपास झाला पाहिजे

निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. अपक्षांच्या मतदानाबाबत संजय राऊतांना कळाले कसे? शिवसेनाला कोणी-कोणी मते दिली हे उद्धव ठाकरेंना कळली आहे. याचा तपास झाला पाहिजे. उद्धव ठाकरे हे निवडणूकीत देखील माफियागिरी करत आहे. संजय राऊतांनी सहा अपक्ष आमदारांची नावे कसे घेतली याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे सोमय्या म्हणाले.

गुप्त मतदानाचा भंग

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असून, त्यांनी निवडणूक आयोगाला लिहले पाहिजे की, निवडणुकीत भ्रष्टाचार झाला आहे, असे सोमय्या म्हणाले. मी निवडणूक आयोगाला यासंदर्भात एक तक्रार दिली असून, चौकशीची मागणी केली आहे. संजय राऊतांनी सहा नावे घेतली आहे त्यांनी गुप्त मतदानाचे भंग केले आहे. त्यांनी ही नावे कोणत्या आधारावर घेतली आहे त्याचा हेतू नेमका काय होता, असा सवाल देखील सोमय्यांनी विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...