आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेने सलग दुसऱ्या वर्षी ६०० कोटींहून अधिक निव्वळ नफा मिळवण्यात यश मिळवले आहे. गत आर्थिक वर्षात ६०३ कोटींचा निव्वळ नफा मिळवलेल्या शिखर बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात ६०९ कोटींचा नफा मिळवला. सोबतच, बँकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) ३८१७ कोटी असून, मागील आर्थिक वर्षीच्या तुलनेत त्यात ५९० कोटी इतकी भरघोस वाढ झाली आहे.
राज्य सहकारी शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा बँकेचा ताळेबंद शनिवारी (ता.६) जाहीर केला आहे. त्यानुसार, सन २०२१-२२ या वर्षात बँकेने ६०९ कोटींचा निव्वळ नफा मिळवला होता. सन २०२२-२३ मध्येही ६०९ कोटी नफा मिळवत सलग दुसऱ्या ६०० कोटींहून अधिक निव्वळ नफा कमविण्यात यश मिळवले. राज्य बँकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) ३८१७ कोटी इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा त्यात ५९० कोटींची वाढ झाली आहे. सर्वाधिक जास्त नेटवर्थ असलेली राज्य शिखर बँक देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.