आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकेक मतासाठी धडपड:आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना, मुक्ता टिळक स्ट्रेचरवरून विधानभवनात

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजारी असूनही राज्यसभा निवडणुकीसाठी बाहेर पडले त्यानंतर मतदान करण्यासाठी ते रुग्णवाहिकेतून मुंबईत गेले आणि मतदानही केले. तर पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळकही दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही मतदानासाठी मुंबईत जाऊन मतदान केले. त्यांना स्ट्रेचरवरूनच ​​​​​​​विधानभवनात मतदानासाठी नेण्यात आले होते.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात 24 वर्षांनंतर मतदान होत आहे. आपापले उमेदवार राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे एकेका मताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून कोणत्याही स्थितीत मत वाया जाऊ न देण्याची खबरदारी पक्षांकडून घेतली जात आहे. त्यामुळे गंभीर आजारी असणाऱ्या आमदारांनाही रुग्णवाहिका व अगदी स्ट्रेचरवरून विधानभवनात नेण्यात आले होते.

जगताप 2 महिन्यांपासून आजारी

लक्ष्मण जगताप हे मागील 2 महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहेत. ते कोमातही गेले होते. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रत्येक आमदाराचे मतदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत येण्याची विनंती पक्षातर्फे करण्यात आली होती. त्यावर आपली तब्येत ठिक असल्याचे सांगून लक्ष्मण जगताप हेदेखील आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले होते.

मुक्ता टिळक कॅन्सरने त्रस्त

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक सध्या कॅन्सरने आजारी आहेत. मात्र, कोणत्याही स्थितीत राज्यसभेच्या मतदानास जाणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. गुरुवारीच त्या मुंबईत दाखल झाल्या. पण, रात्री त्रास सुरु झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आज डॉक्टरांच्या देखभालीसाठी स्ट्रेचरवरून त्यांना विधानभवनात आणण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...