आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Rakul Preet Singh Interrogation At Narcotics Control Bureau Office Today, Deepika Padukone Will Join Tomorrow Latest News And Updates On Bollywood NCB And Drugs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड आणि ड्रग्स:नारकोटिक्स ब्युरोच्या कार्यालयात रकुलप्रीत सिंहची चौकशी, दीपिकाच्या मॅनेजरची सुद्धा आजच होणार चौकशी; मुंबईत तीन ठिकाणी एनसीबीच्या धाडी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिकाची चौकशी करताना मलाही सोबत ठेवा, रणवीरची एनसीबीकडे विनंती

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर आता हे प्रकरण बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचे बनले आहे. अॅक्शनमध्ये असलेल्या एनसीबीकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) एकानंतर एक सिलेब्रिटींची चौकशी केली जात आहे. त्यातच आज सकाळी 10.30 वाजता अभिनेत्री रकुलप्रीत सिंह एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. रकुल गुरुवारीच बंगळुरू येथून एनसीबीच्या कार्लालयात हजर होण्यासाठी मुंबईत आली होती.

एनसीबीच्या तीन ठिकाणी धाडी

तत्पूर्वी एनसीबीच्या टीमने सकाळी मुंबईत तीन ठिकाणी धाड टाकून तपास केला. ही ठिकाणे कोणती हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, एनसीबीने आजच दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला देखील चौकशीसाठी बोलावले आहे.

पती रणवीरने मागितली चौकशीत दीपिकासोबत राहण्याची परवानगी

दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची उद्या चौकशी होणार आहे. तिघींवर अमली पदार्थांचे सेवण करण्याचा आरोप आहे. याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीकडून या नावांचा खुलासा झाला असेही सांगितले जात आहे. त्यातच दीपिका आणि तिच्या मॅनेजरचे काही व्हॉट्सअप चॅट सुद्धा समोर आले आहेत. त्यामध्ये कथितरित्या ड्रग्स खरेदी करण्याबद्दल चर्चा करण्यात आली. या प्रकरणात चौकशीची केली जाणार असल्याचे कळताच दीपिका आणि सारा अली खान गुरुवारी गोव्याहून मुंबईत पोहोचल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीर कपूरने एनसीबीला विनंती केली की चौकशी दरम्यान दीपिकासोबत त्याला देखील राहण्याची परवानगी द्यावी.

बातम्या आणखी आहेत...