आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर भूमिपूजन:'पंतप्रधान राममंदिर निर्माणासाठी कुदळ मारणार', पण रामजन्मभूमी लढ्याच्या गोड शेवटाचे सेलिब्रिशन शिवसेना कसे करणार?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...अशोक गेहलोत यांनी खूश व्हायचे कारण नाही, अमित शहा जेथे असतील तेथून ते राजकीय शस्त्र्ाक्रिया करीत असतात
  • गृहमंत्री महोदय हे सांगत असतील तर कॅबिनेटला उपस्थित असणारे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच ‘आयसोलेट’ करावे लागेल.

राम जन्मभूमीचा कित्येक वर्षांपासूनच्या लढ्याचा अखेर आता शेवट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या राम मंदिर भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अयोध्येत तर दिवाळी साजरी होत आहे. भाजप मोठ्या उत्साहात भूमिपूजनाचे सेलिब्रिशेन करत आहे. तसेच राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र या रामजन्मभूमी लढ्याचा गोड शेवटाचे सेलिब्रेशन शिवसेना कसे करणार हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये राम मंदिराच्या सोहळ्याची योजना सांगण्यात आली आहे. तसेच देशाचे पंतप्रधान राममंदिर निर्माणासाठी कुदळ मारणार यासारखा दुसरा सोनेरी क्षण नसल्याचेही म्हटले आहे. मात्र 500 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्यानंतर या आनंदोत्सवात शिवसेना कशी सहभागी होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येतील या सोहळ्याचे सेलिब्रेशन कसे करणार याविषयी काहीच सांगण्यात आलेले नाही. यावरुन हा आनंदोत्सव कसा साजरा करावा याविषयी संभ्रमात असल्याचे दिसते.

रामाच्या कृपेने हे सावटही दूर होईल!

पंतप्रधान मोदी स्वतः अयोध्येत जाऊन भूमिपूजन करतील. उमा भारती शरयू किनार्‍यावरून ‘मन की आंखे’ उघडून सोहळा पाहतील. आडवाणी, मुरली मनोहर दिल्लीत बसून रामजन्मभूमी लढ्याचा गोड शेवट अनुभवतील. बाकी मंचावरचे प्रमुख अतिथी श्रीरामांचे मंदिर उभारणीचे कार्य पुढे नेतील. संपूर्ण देश अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याने रोमांचित झाला आहे. देशाचे पंतप्रधान राममंदिर निर्माणासाठी कुदळ मारणार यासारखा दुसरा सोनेरी क्षण नाही. कोरोना वगैरे आहेच. तो अयोध्या, उत्तर प्रदेश व संपूर्ण देशात आहे. रामाच्या कृपेने हे सावटही दूर होईल! असे म्हणत शिवसेनेने या सोहळ्याविषयी आनंद व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळच ‘आयसोलेट’ करावे लागेल

गृहमंत्री अमित शहाना कोरोना झाला. यावरुन शिवसेनेने भाष्य केले आहे. गृहमंत्री साहेबांनाच कोरोनाने पकडावे, जखडावे हे अयोध्येतील सोहळ्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. अयोध्येतील सुरक्षा तसेच इतर व्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्रालयावर होती, पण गृहमंत्री साहेबांनाच कोरोनाने पकडावे, जखडावे हे अयोध्येतील सोहळ्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. गृहमंत्री महोदय हे सांगत असतील तर कॅबिनेटला उपस्थित असणारे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच ‘आयसोलेट’ करावे लागेल. असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगालला आहे.

पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांचा बालही बाका होणार नाही

गृहमंत्री शहा यांनी सूचना केल्या आहेत की, जे कोणी गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी स्वतःला ‘आयसोलेट’ करून कोरोना टेस्ट करून घ्यावी. पंतप्रधान मोदींचे निकटवर्ती म्हणून तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे प्रमुख सहकारी म्हणून शहा हे पंतप्रधानांच्या निकट असतात, पण श्रीरामाच्या आशीर्वादाने पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांचा बालही बाका होणार नाही. असे शिवसेनेने सामना अग्रलेखातून म्हटले आहे.

अग्रलेखातून उमा भारतींना टोला

उमा भारती यांचे नाव निमंत्रितांच्या यादीत होते असे म्हणतात, पण त्यांनी स्वतःच जाहीर केले, त्या काही प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. कोरोना संसर्गाची भीती वाटत असल्याने त्या शरयू नदीच्या परिसरातच थांबून भूमिपूजनाशी श्रद्धेने नाते जोडतील. उमा भारती शरयू किनार्‍यावरून ‘मन की आंखे’ उघडून सोहळा पाहतील असे म्हणत शिवसेनेने उमा भारतींना टोला लगावला आहे.

...अशोक गेहलोत यांनी खूश व्हायचे कारण नाही

गृहमंत्री शहा यांच्यावर कोरोनाने झडप घातली व श्री. शहा यांना एकांतवासात जावे लागले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खूश व्हायचे कारण नाही. अमित शहा जेथे असतील तेथून ते राजकीय शस्त्र्ाक्रिया करीत असतात. त्यामुळे गेहलोत सरकारवरील धोका कायम आहे. गृहमंत्री एकांतवासात गेले तसे गेहलोत यांनाही त्यांच्या आमदारांना घेऊन एकांतवासात जावे लागले. म्हणजेच धोका कायम आहे!

बातम्या आणखी आहेत...