आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर ट्रस्ट घोटाळा:राम मंदीर इंतरासाठी राजकारणाचा विषय असला तरी तो आमच्यासाठी श्रद्धा आणि आस्थेचा विषय - संजय राऊत

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कसा योगायोग? जमिनीच्या दोन्ही सोद्यात डॉ. अनिल मिश्राच बनले साक्षीदार

राम मंदिर ट्रस्ट जमीनीच्या घोटाळ्याच्या आरोपावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आप नेते संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी ट्रस्टवर गंभीर आरोप केले होते. 2 कोटी रुपयांची जमीन पाच मिनटांत 18.5 कोटी रुपयांची कशी होऊ शकते याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, ट्रस्टच्या या घोटाळ्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून श्रद्धेला ठेच पोहचली आहे. राम मंदीर हा इतरांसाठी राजकारणाचा विषय असला तरी तो आमच्यासाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत हे सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, यामुळे समस्त हिंदू समाज दुखावला असून यावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे. राम मंदिरासाठी संपूर्ण भारतातून पैसे गोळा करण्यात आले असून यासाठी सर्व सामान्य माणसांनीदेखील वर्गणी दिली आहे. जर ट्रस्ट या निधीचा गैरवापर करत असेल तर त्याच्या श्रद्धेला काहीही अर्थ उरणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

कसा योगायोग? जमिनीच्या दोन्ही सोद्यात डॉ. अनिल मिश्राच बनले साक्षीदार
सुरुवातीला ही जमीन हरीश पाठक, कुसुम पाठक यांच्याकडून सुलतान अन्सारी व रविमोहन तिवारी यांनी खरेदी केली तेव्हा साक्षीदार क्र. 1 म्हणून डॉ. अनिल मिश्रा होते. डॉ. मिश्रा श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त आहेत. कोणत्याही धनादेशावर डॉ. मिश्रा हेच साईनिंग अॅथॉरिटी आहेत. अन्सारी-तिवारी यांनी जमीन श्री राम जन्मभूमी ट्रस्टला विकली तेव्हा डॉ. मिश्रा साक्षीदार क्र.2 बनले. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधी त्यांची बाजू जाणून घेण्यास उत्सुक होते. मात्र डॉ. मिश्रांनी धावतच कार गाठली.

आप नेते संजय सिंह यांनी केले होते गंभीर आरोप
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विटरवरुन माहिती दिली असून त्यांनी यासोबत काही फोटो शेअर केले आहे.