आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख:सभागृहात गदारोळ, शेलारांनी मागितली माफी, सातपुतेंनी व्यक्त केली दिलगिरी

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आमदार राम सातपुते उल्लेख एकेरी केला. यावरुन विधानसभेत आज गदारोळ झाला. यावर माफी मागण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यानंतर मी रेकार्ड तपासतो असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, त्यानंतर लगेचच आशिष शेलार यांनी जबाबदारी घेत दिलगिरी व्यक्त करीत माफी मागितली, त्यानंतर राम सातपुते यांनीही दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे हा गदारोळ संपुष्टात आला.

कोण काय म्हणाले?

सातपूतेंनी माफी मागावी - जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, आमचे नेते शरद पवार यांचा ऐकेरी उल्लेख केला गेला. आमदार सातपुते यांच्याकडून हा प्रकार झाला. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी. त्यांनी माफी मागीतल्याशिवाय हे थांबणार नाही. आमच्या सर्वोच्च सदस्याचा ऐकेरी उल्लेख केला त्यावर माफी तत्काळ मागावी.

कुणाचाही ऐकेरी उल्लेख नको - अजित पवार

अजित पवार म्हणाले, सभागृहात अध्यक्ष आणि मी सुद्धा नव्हते. प्रत्येकाला वरिष्ठांचा अभिमान असतो आणि तो असायला हवा. कुणाच्या पक्षाच्या वरिष्ठांबाबत वेगळा शब्द आला तर ते कुणालाच आवडणारे नाही. आमदार सातपूते यांनी शरद पवारांचा जो एकेरी उल्लेख केला. तुम्ही म्हणता की, मी तपासतो. पाहतो यात वेळ जातो. एकेरी उल्लेख जर झालेला असेल तर माफी मागायला हवी.

..तर असेच पायंडे पडतील

अजित पवार म्हणाले, हे नवीन पायंडे पडतील. उद्या भावना भडकतील असे काही बोलले गेले यात सत्ताधाऱ्यांचे नेते असो की, विरोधकांचे याबद्दल कुणी बोलले तर शब्दांनी शब्द वाढत जाईल. जे तपासायचे ते संध्याकाळी तपासा. पण आमदार सातपूते यांनी जो काही एकेरी उल्लेख केला, त्याबद्दल त्यांनी माफी मागून विषय संपवावा.

नवीन गोष्टी करू नका

अजित पवार म्हणाले, मी अनेकदा विरोधी पक्षनेता म्हणून माफी मागितली आहे. जर असे पायंडे पडणार असतील आणि विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठांबाबत वाक्यरचना केली जाईल तेव्हा आम्हीही माफी मागणार नाही. आम्ही म्हणू रेकार्ड तपासा काढायचे तर काढा. ठेवायचे तर ठेवा अशा नवीन गोष्टी करू नका. त्यात वाईट वाटायचे कारण नाही. आम्ही वरिष्ठ नेत्यांचा आदर करतो तोही सत्ताधाऱ्यांनीही आमच्या नेत्याचा करायला हवा. आपण म्हणता की, तपासून बघतो. मी म्हणतो की, त्यांनी माफी मागावी. मला संसदीय कामकाजमंत्र्यांनी सांगितले होते की, आम्ही मार्ग काढतो.

मला रेकार्ड तपासू द्या - राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, कुठल्याही पक्षाच्या नेत्याचा आदर करायलाच हवा. त्याबद्दल दुमत नाही. वरिष्ठ नेत्यांबद्दल कुणी जर बोलले तर स्वीकारले जाणार नाही. फक्त मला ते रेकार्ड तपासून बघू द्या. जर तसे असेल तर रेकार्डवरून ते काढले जाईल.

शेलारांनी माफी मागितली

आशिष शेलार म्हणाले, अजित पवारांनी आमदार सातपूते यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार यांच्याकडे जी माहीती आहे तिच माहीती माझ्याकडे आहे. खऱ्या अर्थाने मला थोडक्यात सांगायचे आहे की, शरद पवार यांचा अपमान, उपमर्द घालून पाडून बोलणे हे आम्हाला मान्य नाही. या सदनात कुठल्याच नेत्याचा अपमान, उपमर्द होईल असे बोलता कामा नये. अध्यक्षांना तपासायचे असेल तर तपासा ते तुमचे काम आहे, पण भाजपतर्फे मी दिलगीरी नाही तर माफीही मागतो तो विषय नाही.

मी ही त्यांच्या मताशी सहमत

आशिष शेलार म्हणाले, विषय आहे की, या सदनात चुकाचा पायंडा पडू नये या अजित पवारांच्या मताशी मी सहमत आहे. आमदार राम सातपूते यांना विनंती करतो की, माझा सवाल आहे की, जितेंद्र आव्हाड बोलताना हिंदु धर्माच्या भावनाबद्दल अनादर होतो. मी सातपूतेंना विनंती करतो की, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतील.

राम सातपुतेंनी दिलगिरी व्यक्त केली

राम सातपुते सभागृहात म्हणाले की, त्यांच्या जे मनात आहे, ते मी सांगतो. सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. ''जितेंद्र आव्हाड जेव्हा भाषणाला उभे राहीले त्यांच्या भाषणातून सनातन धर्म वेगवेळ्या विषयावर अतिशय चुकीच्या पद्धतीने टिप्पणी केली. मी भूमिका मांडत असताना संधी दिली गेली नाही. अतिशय तुच्छतेने माझ्याकडे हातवारे करून मागासवर्गीय मतदारसंघातून तुम्ही निवडून आला.''

बातम्या आणखी आहेत...