आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंची प्रतिक्रिया:अनिल देशमुखांवर करण्यात आलेली कारवाई योग्यच असल्याचे रामदास आठवलेंचे मत, तर अजित पवारांना चौकशीला सामोरे जाण्याचा दिला सल्ला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवारांना चौकशीला सामोरे जाण्याचा सल्ला

सध्या राजकीय वातावरण तापलेले दिसत आहेत. नवाब मलिक हे सातत्याने एनसीबी आणि भाजप नेत्यांवर आरोप करत आहेत. दरम्यान रात्री उशीरा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. असे असतानाच आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील आयटीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यानंतरपासून या कारवाईवर विविध राजकीय नेत्यांचा प्रतिक्रिया येत आहेत. आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुखांच्या अटकेवर प्रतिक्रिया देत असताना आठवले म्हणाले की, 'अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांच्यावर परमबीर सिंहांकडून 100 कोटी वसुलीबाबत आरोप करण्यात आलेले होते. याविषयी गेल्या काही महिन्यांपासून चौकशी सुरु होती. चौकशीनंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. गृहमंत्रीपदाच्या काळात पदाचा दुरुपयोग केला असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांनी वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्याची आवश्यकता होती. अनेकवेळा ईडीकडून सवलत दिली जाते, कारवाई केली जात नाही. ईडीला पुरावे मिळाल्यानंतरच कारवाई करण्यात येते. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई योग्यच आहे' असे मत आठवलेंनी व्यक्त केले आहे.

अजित पवारांना चौकशीला सामोरे जाण्याचा सल्ला
दरम्यान आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनेक नोंदणीकृत मालमत्ता जप्त करण्यासाठी तात्पुरती नोटीस बजावली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 27 मालमत्ता, गोव्यातील 250 कोटींचे रिसॉर्ट आणि 600 कोटींच्या साखर कारखान्याचा समावेश आहे. त्यात दिल्लीतील काही मालमत्तांचाही समावेश आहे. या मालमत्तांची किंमत 1400 कोटींहून अधिक आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले की, 'अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर अन्याय व्हायला हवा असे आम्हाला वाटत नाही. पण ईडीच्या चौकशीत त्यांना काही पुरावे मिळाले आहेत. त्यांनी जी काही नोटीस पाठवली आहे, त्या चौकशीला अजित पवारांनी जावे' असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...