आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:'गो कोरोना गो'चा नारा देणाऱ्या रामदास आठवलेंना कोरोनाची लागण, काल अर्धाच मास्क लावत कार्यक्रमात होते उपस्थित

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री पायल घोषला आठवले यांनी सोमवारी आरपीआयची सदस्यता दिली होती

केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे प्रमुख रामदास आठवले यांनी 'गो कोरोना गो' अशी घोषणा दिली होती आता तेच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. अभिनेत्री पायल घोषला त्यांच्या पार्टीत प्रवेश देण्यासाठी सोमवारी आठवलेंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी समोर आलेल्या फोटोंमध्ये आठवले यांच्या तोंडावर एक मास्क आहे, परंतु त्याचे तोंड व नाक दोन्ही खुले आहेत.

मंगळवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आठवले यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. कफ आणि अंगदुखीच्या तक्रारीनंतर आठवले यांची सोमवारी कोरोना टेस्ट झाली होती. डॉक्टरांनुसार, त्यांची स्थिती सामान्य आहे. यामुळे सध्या त्यांना घरीच राहण्याचे सांगितले आहे.

प्रसिद्ध झाला होता 'गो कोरोना गो'चा नारा
देशात कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असताना रामदास आठवले यांनी एप्रिल महिन्यात 'गो कोरोना गो'चा नारा दिला होता. त्यांचा हा नारा कोरोना काळादरम्यान खूप व्हायरल झाला होता.

राज्यातील या नामांकीत राजकारण्यांना झालाय कोरोना
महाराष्ट्रात राजकारणातील अनेकांना कोरोनाने विळखा घातला आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्यावर ब्रीज कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली ते आयसोलेशनमध्ये आहेत. या दोघांपूर्वी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री अशोक चव्हाण, असलम शेख, उदय सावंत, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, संजय बंसोड आणि अब्दुल सत्तार यांना कोरोना झाला होता.