आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचकत बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चा सध्या सुरु आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, या युतीमुळे मोठा काही फरक महाराष्ट्रात पडणार नाही, 'त्या' शक्तीला मी भीमशक्ती मानत नाही, कारण, सगळी शक्ती माझ्याबरोबर आहे, असा दावाच केंद्रीय मंत्री आठवले यांनी केला आहे.
आठवले काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की एकटा पक्ष निवडणुकीत स्वत:चा प्रभाव दाखवू शकत नाही. म्हणून प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी सोबत जातील असे वाटते. मात्र उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची युती झाली, आणि प्रकाश आंबेडकर जरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले. तरी आमच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही.
समाज बांधव माझ्यासोबत
आठवले म्हणाले की, दलित समाज बांधव हे मोठ्याप्रमाणात माझ्याबरोबर आहे. मी रिपब्लिकन पक्षाचे नाव टिकवून ठेवले आहे. आंबेडकरांची शक्ती ही वंचित शक्ती आहे, तर खरी शिवशक्ती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहे, असे सांगताना राज्यात दुसऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तींचा विषय नाहीच, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
'ती' भीमशक्ती नाही
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, त्या शक्तीला मी भीमशक्ती मानतच नाही, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीसंदर्भातील चर्चेत भीमशक्ती नाहीच. मी सध्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती ही शिंदे -फडणवीस यांच्यासोबत आहे, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.