आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुन्हा बोलले आठवले:मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता पुढचा नंबर महाराष्ट्राचा -आठवले; शरद पवारांना आधीच दिला एनडीएमध्ये येण्याचा सल्ला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप, राष्ट्रवादी आणि रिपाइं अशा तिघांची महाराष्ट्रात सत्ता येईल -आठवले (फाइल फोटो)
  • काँग्रेसमध्ये आता पायलट यांना मान राहिलेला नाही, पायलट यांच्या निर्णयाचे स्वागत -आठवले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना एनडीएमध्ये सामिल होण्याचे निमंत्रण देणारे रामदास आठवले यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. राजस्थानातील राजकीय घडामोडी पाहता आठवले म्हणाले, की मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता राजकीय उलटफेरांसाठी महाराष्ट्राचाच नंबर आहे. सोबतच, सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. आठवले यांनी मंगळवारी एक व्हिडिओ मेसेज जारी केला. यामध्ये महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन होणार असून या ठिकाणी भाजप सरकार स्थापित करणार आहे असे ते म्हणाले.

सचिन पायलटबद्दल आठवले म्हणाले...

सचिन पायलट आणि तयांच्या समर्थकांनी भाजपशी हातमिळवणी केल्यास राजस्थानातून काँग्रेसची सत्ता टिकणार नाही. काँग्रेसमध्ये आता पायलट यांना मान राहिलेला नाही. त्यामुळे, पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. पायलट आणि त्यांचे 30 आमदार भाजपसोबत आल्यास राजस्थानात कमळ फुलेल असेही आठवले म्हणाले आहेत.

पवारांना दिले होते निमंत्रण

तत्पूर्वी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएत सामिल होण्याचा सल्ला दिला होता. महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसची साथ सोडून पवारांनी मोदींसोबत यावे. पवार एनडीएमध्ये आले तर महाराष्ट्रासह देशाचा देखील विकास होईल. तसेच महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं अशा महायुतीची सत्ता येईल असे आठवलेंनी सांगितले होते.