आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेमडेसिवीरवर राजकारण नको:रेमडेसिवीरचा 'गेम' डेसिवीर करू नका! केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपल्याच शैलीत ठाकरे सरकारला सुनावले

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंनी उडी घेतली. रामदास आठवले यांनी आपल्याच शैलीत सोशल मीडियावर लिहून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला. रेमडेसिवीरचा 'गेम'डेसिवीर करू नका असे आठवले म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला उद्देशून बोलताना केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री म्हणाले, रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

राज्य सरकारचीही जबाबदारी

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले, की कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा खोटा आणि खोडसाळ आरोप राज्य सरकार करत आहे. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी मोदी चांगले काम करत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस, ऑक्सिजन आणि रेमडेसिवरसह सर्व औषधांचा पुरवठा करत आहे. तरी राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये.

फडणवीसांनी करून घेतली औषध कंपनीच्या मालकाची सुटका

उल्लेखनीय बाब म्हणजे, मुंबईत एका औषध कंपनीच्या गुजराती मालकाला ताब्यात केल्यानंतर रेमडेसिवीर औषधींवरून राज्यातील वातावरण तापले. त्याची सुटका करून घेण्यासाठी शनिवारी रात्री उशीरा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांशी वाद घालून मालकाची सुटका करून घेतली. पोलिसांनी या व्यापाऱ्याकडे रेमडेसिवीरचा अवैध साठा असल्याच्या संशयावरून चौकशी केली होती. पण, अवैध साठा शोधूनच दाखवा असे आव्हान फडणवीसांनी केले. सोबतच, केंद्राच्या परवनागीने आपण या कंपनीकडून राज्य सरकारला रेमडेसिवीर पुरवठा करणार आहोत असेही फडणवीसांनी सांगितले. यावेळी सर्व नियमांच्या आधीन राहूनच सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

अनेक औषध कंपन्या महाराष्ट्र राज्य सरकारला रेमडेसिवीर विकत नाहीत. आणि भाजप नेत्यांना ते खरेदी करण्याची केंद्राकडून परवानगी कशी मिळते असा सवाल आघाडी सरकार करत आहे. नेमक्या याच गोष्टीवरून महाराष्ट्र सरकारचा इगो दुखावला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...