आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना - वंचित एकत्र येऊन फायदाच नाही:उद्धव ठाकरेंकडे ना शिवसैनिक आहेत, ना प्रकाश आंबेडकरांकडे भीमसैनिक- रामदास आठवले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरीही काहीच फरक पडणार नाही. भीमशक्ती माझ्याकडे आहे आणि वंचितशक्ती त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे ते दोघे एकत्र आले तरीही फारसा परिणाम होणार नाही. जागा वाटपाटपात बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचे जमणार नाही.'' अशी खरमरीत टीका आरपीआय (आठवले गट)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज केली. ते माध्यमांशी बोलत होते.

झेडपी, पंचायत समित्या मिळतील

रामदास आठवले म्हणाले, मनपा निवडणुका, लोकल बाॅडीच्या निवडणुकीत भाजप - शिंदे गटासोबत आपली राजकीय युती होईल. रिपब्लिकन पक्षाला आठ दहा पंचायत समित्या आणि तीन चार जिल्हा परिषदा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहे.

माझ्याकडेच भीमशक्ती

रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरीही काहीच फरक पडणार नाही. भीमशक्ती माझ्याकडे आहे आणि वंचितशक्ती त्यांच्यासोबत आहे. त्यामुळेल दोघे एकत्र आले तरीही फारसा परिणाम होणार नाही. जागा वाटपाता बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचे जमणार नाही.

त्यांचे किती एकत्रीकरण होईल?

रामदास आठवले म्हणाले, त्यामुळे शिवसेना आणि वंचित पक्ष दोघे एकत्र आले तरीही जागा वाटपात त्यांचे किती एकत्रीकरण होईल हे सांगता येत नाही. त्यांचा आमच्यावर फारसा परिणाम होणार नाही. एकनाथ शिंदेंचे बंड साधे नाही ते महाबंड आहे. शिवसेनेच्या 66 वर्षांतील ते महाबंड आहे.

एकनाथ शिंदेंनाच धनुष्यबाण मिळणार

उद्धव ठाकरेंकडे शिवसैनिक फारसे उरले नाहीत. बाळासाहेब आंबेडकरांकडे वंचितशक्ती आहे. त्याचा काही उपयोग होणार नाही. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हही एकनाथ शिंदे यांनाच मिळणार आहे असा दावाही रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

लोकल बाॅडी निवडणुक लढवणार

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 350 आणि एनडीए 450 खासदार निवडून येणार आहेत. सध्या भाजपने 144 जागांवर मोहीम सुरू केली आहे, त्यामध्ये आरपीआयला आम्ही जागा मागणार आहोत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या पक्षाला जागा मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ती यात्रा भारत तोडण्याची!

रामदास आठवले म्हणाले, खासदार संजय राऊत म्हणतात तस राज्यात सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर आहे, शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार 2024 पर्यंत कार्यकाळ पूर्ण करेल, आणि 2024 ला परत आमची सत्ता येणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही, तोडण्याची यात्रा आहे. पहिला काँग्रेस जोडा, राहुल गांधी पंतप्रधान होणे अशक्य आहे.

बातम्या आणखी आहेत...