आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे यांनी माझा मुलगा योगेश कदम यांना जिवानिशी संपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शनिवारी टीव्ही-9 शी बोलताना केला.
रामदास कदम म्हणाले की, यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगेश कदम याला राजकारणातून पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना यश ओल नव्हते. म्हणून की काय आता त्याला जिवानिशी संपवण्याचा प्रयत्न केला की काय, असा मला संशय आहे, या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.हा अपघात नसून घातपात करण्याचा प्रयत्न आहे असा मला दाट संशय आहे. याबाबत मी पोलिसांशी बोललोय. यासंदर्भात कसून चौकशी करण्याबाबत त्यांना सांगितले आहे.
असा घडला अपघात
आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालकही पळून गेला. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
आमदार योगेश कदम यांची अपघातानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी सुखरूप आहे, काळजी करू नका. आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप असल्याचा संदेश त्यांनी व्हिडिओ शेअर करून दिला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्यानुसार होतील अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.
अपघात कि घातपात?
टँकर चालक फरार झाला आहे. त्यामुळे अनेकांना शंका असून हा अपघात कि घातपात ? याची शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक, आमदार योगेश कदम समर्थकांनी अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.