आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभ्यास कमी आहे, असा टोला माजी मंत्री रामदास कदम यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी माझ्या नावाची धास्ती घेतली आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात कितीही सभा घेतल्यातरीही काही फरक पडणार नाही, योगेश कदम पुन्हा निवडून येणारच असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
उद्धव ठाकरे येणार म्हणून 4 ते 5 जिल्ह्यातून माणसं आणण्याची तयारी सुरू आहे. यातून उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांची धास्ती घेतली आहे, हे यातून दिसून येत आहे. 19 मार्च रोजी त्याच ठिकाणी मी सभा घेणार असून तिथे सर्वांना उत्तरे देणार आहे. बाहेरुन लोक आणून खेडमध्ये रातकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची काळजी मी करत नाही, उद्धव ठाकरेंनी यावे बोलावे आणि परत जावे मी त्यांची दखल घेत नाही, पण सर्वांची उत्तरे मी व्याजासह परत करेल. संजय कदम हे गावठी आमदार त्यांना मी महत्त्व देत नाही. उद्धव ठाकरेंनी पर्यावरण खाते देऊन मला बाजूला बसवले होते.
योगेश कदमला 50 खोके दिले
रामदास कदम म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी खेडच्या विकासासाठी आम्हाला 50 कोटीं रुपये दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषेत बोलायचे झाले तर आम्हाला 50 खोके दिले आहेत. उद्धव ठाकरेंना रामदास कदम आणि योगेश कदम यांना राजकारणातून कायमचे संपवायचे आहे असा आरोप रामदास कदम यांनी पुन्हा केला आहे. बाहेरच्या पक्षातून यासाठी उद्धव ठाकरेंनी माणसे आणली असे सांगतानाच अनिल परबांवर त्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे एकदा नाही तर कितीही वेळा खेडमध्ये आले तर आमचा पराभव होणार नाही असा विश्वास रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.