आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैप्यस्फोट:‘सेना-भाजप युती राऊतांमुळे फिस्कटली’ रामदास कदम यांनी केला गाैप्यस्फोट

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपसाेबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार झाले हाेते. पण एेनवेळी संजय राऊत तेथे आले आणि काम बिघडले, असा गाैप्यस्फोट रामदास कदम यांनी केला.

माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडल्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद बोलावून ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. कदम म्हणाले, नारायण राणे आणि नवनीत राणा यांनाही अटक झाली होती, मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा वाटले ते मोठी लढाई लढायला चालले आहेत. ते लढाई जिंकून येतील, असा विश्वास त्यांना वाटत असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? : शिवसेनेतून जे फुटले ते भाजपचे गुलाम झाले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. गुलाम कोण कोणाचे होते ते बघा. तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम आहात का? याचा विचार केला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...