आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे असून, मी त्याचा साक्षीदार आहे, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी आज केला. उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये झालेल्या सभेत जोरदार टोलेबाजी केली होती. रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कडव्या शब्दांत प्रत्युत्तर दिले.
उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही तर शंभर वेळा खेडमध्ये आलात, तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही. खेडमधल्या कालच्या सभसाठी मुंबई-ठाण्यातून माणसे आणली, असा आरोपही कदम यांनी केला.
शब्दांमध्ये तुम्ही अडकलात
काल विराट सभा झाली असे तुम्ही म्हणालात पण कालच्या सभेत खेडचे किती लोक होते? मुंबई ठाण्यातून किती लोक आणले होते. काही लोक भाषण सोडूनही जात होते, असे रामदास कदम म्हणाले. चोर, गद्दार, खोटे या शब्दांमध्ये तुम्हीच अडकला आहात. ज्याला काविळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते. बाळासाहेब असले असते तर तुम्हाला मुख्यमंत्री होता आले असते का? असा सवालही त्यांनी विचारला.
मला संपवण्याचे प्रचंड प्रयत्न
रामदास कदम म्हणाले की, माझा मुलगा योगेश कदमला तुम्ही संपवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. योगेश कदम यांना संपवण्यासाठी काय कारस्थान झालं ते 19 तारखेला उदय सामंत सांगणार आहेत. मला तर तुम्ही संपवणार होताच. मीडियासमोर जाण्याची मला बंदी घातली होती." "2009 च्या निवडणुकीत मला पाडा असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचा दावाही रामदास कदम यांनी केला.
तुम्ही गद्दारी केली
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना तुमचे हात बरबटलेले आहेत. तुम्ही भ्रष्टाचारी आहात. तुम्ही अशोक पाटील यांचे तिकीट कापण्यासाठी किती पैसे घेतले? मुख्यमंत्री होण्यासाठी तम्ही गद्दारी केली. तुम्ही गद्दार आहात. तुमच्या भोळ्या चेहरामागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो, याचा मी साक्षीदार आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.