आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''उद्धव ठाकरेंना कान चावणारे सोबत लागतात, बडव्यांमुळे त्यांचे काही खरे नाही.'' अशी जहरी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज केली. ठाकरेंसोबत सातत्याने असलेले नेते सुभाष देसाई, अनिल परब, विनायक राऊत यांच्याकडे कदम यांचा रोख होता.
परबांना आत टाकण्यास उशीर
रामदास कदम म्हणाले, अनिल परब यांना आत टाकले पाहिजे, त्यांना आत टाकण्यास का उशीर होत आहे, हे मला उमजत नाही. माझा मुलगा योगेश यांना बाजूला ठेवून दापोली मंडणगड नगरपंचायत अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घातली.
माझ्या मुलावर अन्याय
रामदास कदम म्हणाले, माझ्या मुलावर सर्वात जास्त अन्याय अनिल परब यांनी केला आहे. शिवसेना संपवायची सुपारी अनिल परब यांनी घेतली. उद्धव ठाकरे यांना अशीच माणसे लागतात. अनिल परब, सुभाष देसाई आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंना लागतात. जोपर्यंत हे बडवे बाजूला जात नाहीतस तोपर्यंत उद्धव ठाकरेंचे काही खरे नाही.
शिंदे, भाजपचे आभार माना
रामदास कदम म्हणाले, भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय झाला. लटके यांना तीन लाखांपैकी 66 हजार मते मिळाली. खरे तर टीका करण्याऐवजी ठाकरेंनी भाजप, एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला हवे. त्यांनीच संवेदनशिलपणा दाखवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.